सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

      तू तिथेच अजुनी … 

दिवसामागून दिवस सरले, काळामागून काळ 
तू तिथेच अजुनी शोधत स्वतःची सकाळ… 
आयुष्यभर जळत राहते, अस्तित्वाचे सोडून मीपण 
तू तिथेच अजुनी दुसर्यांसाठी होऊन सरपण… 
आशेचं गाठोड आणि कुणीतरी सोबत असताना,
तू तिथेच अजुनी पाहते  स्वप्नांना दूर जाताना… 
क्षण असाही येतो वळून मागे पाहता पाहता,
तू तिथेच अजुनी सगळे काही सरता सरता… 
अखेर ती विचार करते, जाते मी काय घेउनि…???
आयुष्याकडून उत्तर येते….तू तिथेच अजुनी…तू तिथेच अजुनी…. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा