"निरागसता " हल्ली लहान मुलांमधेही दिसून येत नाही , किंबहुना लहान मुल मोठ्यापेक्षा जास्त हुशार दिसतात. या आधी मी असा निरागस चेहरा कधीच पाहिला नव्हता. साधी -भोळी माणसं असतात ,कधी कधी भेटतातही .. पण खरी निरागसता मी आज पाहिली ...
आज मी एक मुलगी पाहिली... हो मुलगीच होती ती , कारण तिच्या लग्नाला चारच दिवस झाले होते. आज पहिल्यांदा तिला पाहिलं... खरं तर तीच वर्णन कसं करू हेच कळत नाही. आजूबाजूची दुनिया,या लोकांची दुनियादारी, स्वार्थ या सगळ्याची लांबलांब पर्यंत तिला झळ सुद्धा लागली नसावी , अस वाटत होत. जगात काय घडतय याच काहीही देणघेण तिला नसावं. तिच्या आयुष्यात जे काही घडतय त्यात ती खूप जास्त समाधानी असावी ,अस तिला बघताक्षणी वाटल....
न विकत मिळणाऱ्या गोष्टीमध्ये "निरागसता " मोडते.ज्यांच्याकडे ती असते ते खरच श्रीमंत असतात, पण त्यांनाच हे माहित नसत.पुढच्या वेळेस मी तिला भेटेन तेव्हा तिच्यातली "निरागसता "अशीच अबाधित राहावी, हीच माझी इच्छा ....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा